पैठण येथे संकल्पदीप आश्रमात अनाथ मुलांसोबत तरुणांकडून अनोखा रक्षाबंधन सोहळा

Foto
: पैठण, (प्रतिनिधी) : नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करत सामाजिक भान जपण्याच्या उद्देशाने पैठण येथील तरुण मित्रांनी यंदाचा रक्षाबंधनाचा सण संकल्पदीप अनाथाश्रमातील लहान मुलांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला.

अनाथाश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत तरुणांनी सामाजिक एकतेचा वस्तुपाठ घालून दिला आहे. या उपक्रमांतर्गत मित्रांनी एकत्र येत आश्रमातील सर्व मुलांसाठी राख्या व चॉकलेट्सची खरेदी केली होती. आश्रमातील लहान मुलींनी उपस्थित तरुणांना  या प्रसंगी मुलांसाठी विशेष भोजनाची सोय करण्यात आली होती, 

ज्यामध्ये अतिशय छान आणि चविष्ट भट्टी मेनू तयार करण्यात आला होता. तरुणांनी मुलांसोबत खेळत, गप्पा मारत वेळ घालवला आणि सर्व मुलांसोबत एकत्र बसून आनंदाने भोजन केले. नेहमीच्या सणांपेक्षा या मुलांसोबत वेळ घालवून मिळणारे समाधान शब्दातीत असल्याची भावना सर्व मित्रांनी व्यक्त केली.

एका यापुढेही केवळ दिवसापुरता मर्यादित न राहता, अनाथ मुले आणि वृद्धांसाठी असे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प या तरुणांनी व्यक्त केला आहे.
अत्यंत प्रेमाने राखी बांधली.